मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक 03-02-2023रोजी सोनवडे येथे करण्यात आले. मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराज देसाई (दादा) आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी शिवाजीराव देसाई विद्यालयाचे विद्यार्थी व अध्यापक उपस्थित होते.
शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे News and Events स्व. शिवाजीराव देसाई अर्थात आबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे भूमिपूजन
नियोजित कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब या कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांनी भूमिपूजन समारंभास शुभेच्छा दिल्या. स्व. आबासाहेबांनी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना आणि मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून पाटण तालुक्याच्या सहकार आणि शिक्षण क्षेत्रात उभे केलेले कार्य आदर्शवत आहे. सोनवडे येथील शाळेच्या आवारात प्रतिष्ठापना होणारा त्यांचा अर्धाकृती पुतळा सर्व विद्यार्थी व नागरिकांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी मा.ना.श्री.शंभूराज देसाई साहेब यांनी २०२२-२३ या वर्षांतील कोयना भूंकप निधीतून मंजूर झालेल्या इमारत दुरूस्ती कामांची पाहणी मा.यशराज देसाई दादा व मा.श्री.रविराज देसाई दादा यांनी केली, यावेळी विद्यालयाची इमारत दर्जेदार व सुशोभित ,व आकर्षक व्हावी,अशा संबधित अधिका-यांना सूचना देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार,न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ धावडे या विदयालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.पी.एल.केेडे ,श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अजित शिंदे ,माजी मुख्याध्यापक मा.श्री.कुमार जमदाडे,सोनवडे,सुळेवाडी,शिंदेवा डी,हुंबरवाडी गावचे सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य,विविध संस्थाचे पदाधिकारी,आजी -माजी विदयार्थी,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ,विदयालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विदयार्थी उपस्थित होते.




























