शाळेची माहिती

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी या संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे  या विद्यालयाची स्थापना १९ जुलै १९८३ साली झाली.मोरणा शिक्षण संस्थेचे पहिले  माध्यमिक विद्यालय सोनवडे या ठिकाणी श्री नवलाईदेवीच्या  मंदिरामध्ये तसेच हनुमान मंदिरामध्ये  हे विद्यालय अवघ्या ४० विद्यार्थ्यावर सुरु झाले होते   आज या विद्यालयामध्ये जवळपास ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,                 
हे विद्यालय सुरु करण्यामागचा मुख्य हेतू,उद्देश असा होता की,सोनवडे या गावात  इ.५ वी ते इ.७ वी पर्यंत प्राथमिक शाळा होती,परंतु ७ वी पर्यंत शाळा पूर्ण झाल्यानंतर पुढील  शिक्षण घेण्यासाठी सोनवडे तसेच सोनवडे परिसरातील मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी मरळी किंवा  कुंसरूड या ठिकाणी पायी चालत जावे लागत होते,त्यामुळे विशेष करून मुलींना माध्यमिक शिक्षण  घेता येत नव्हते त्यामुळे ही बाब सोनवडे गावातील ग्रामस्थाच्या लक्षात आली,त्यावेळी मा.श्री.डी.एम. शेजवळ  (दादा),श्री.खाशाबा शेजवळ (बापू)यांनी सोनवडे व सोनवडे परिसरातील ग्रामस्थ एकत्र येवून   लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई उर्फ  आबासाहेब यांची भेट घेतली,व सत्य वस्तुस्थिती सांगितल्यानंतर आबासाहेबानी कोणत्याही क्षणाचा  विलंब न लावता मोरणा शिक्षण संस्थेचे पहिले रोपटे सोनवडे या ठिकाणी लावले,                                

सुरुवातीला हे विद्यालय विनाअनुदान तत्वावर सुरु झाले होते,कोणत्याही प्रकारचे शिक्षकांना   मानधन नव्हते,त्यामुळे  विद्यालय चालविताना तारेवरची कसरत करावी लागली होती,व अखेर १ जून  १९९१ ला विद्यालयाला १००% अनुदान सुरु झाले  आज या विद्यालयाची सुसज्ज इमारत सर्व सोयीनियुक्त असून मराठी व सेमी माध्यमचे इ.५ वी  ते इ.१० वी पर्यंत आहेत या विद्यालयाला उज्ज्वल निकालाची परंपरा आहे,माध्यमिक शालांत परीक्षेचा  निकाल दरवर्षी उत्कृष्ट लागत आहे,तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केलेली  आहे, या विद्यालयांतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करत आहेत