विज्ञान दिन ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्साहात संपन्न
दि.28
श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक मॉडेलच्या उद्घाटनाने प्राचार्य अजित शिंदे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक भित्तीपत्रिका याचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते झाले.
याप्रसंगी डॉ.सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्नेहल रजपूत मॅडम यांनी केले प्रास्ताविका मध्ये रामन इफेक्ट काय होता हे त्यांनी समजावून सांगून विद्यार्थ्यांनी संशोधन करावा असे आवाहन केले.
त्यानंतर कु स्वराली गिरी व कु. श्रावणी पाटील या विद्यार्थिनींनी आपले भाषणे केली. शिक्षक मनोगतामध्ये प्रा. निलोफर संदे, प्रा.सुनील बेलवणकर सर, प्रा. तनुजा शेजवळ व प्रा. हुदा इनामदार यांनी आपले मनोगते व्यक्त करून विज्ञान दिनाचे महत्त्व प्रतिपादन केले .
शिक्षक मनोगतानंतर विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक जनजागृती व्हावी त्यांचे ज्ञान वाढावे यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेमध्ये श्रावणी पाटील व अस्मिता साळुंखे या दोन विद्यार्थिनींनी प्रश्नमंजुषा स्पर्धा जिंकली.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य अजित शिंदे यांनी डॉ. सी व्ही रामन यांची कार्य प्रतिपादन करतानाच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा चिकित्सकृती बाळगावी व नवनवीन संशोधन करावे असे आवाहन केले
कार्यक्रमाचे आभार कु. संचिता शेजवळ हिने मानले तर तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती भिसे व श्रावणी साळुंखे या विद्यार्थिनींनी केले.
सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहाने व विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त कु.श्रावणी पाटील,अस्मिता साळुंखे यांचे कौतुक करताना प्राचार्य व प्राध्यापक
















