आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा जी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अजित शिंदे यांनी गुरुपौर्णिमेविषयी मार्गदर्शन करत असताना मानवी जीवनातील गुरुचे स्थान अधोरेखित केले या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता अकरावी वाणिज्य व शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी केले होते. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मनोगत मध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व याविषयी मनोगत व्यक्त केले गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी सर्व प्राध्यापकांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी लाभली व त्यांनी विद्यार्थ्यांच्या या कृतज्ञतेबद्दल कौतुक केले
कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने झाली










