मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.
27 फेब्रुवारी.
श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे आज कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिन संपन्न झाला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी भाषेच्या लेखकांवर व साहित्यावर आधारित 10 भित्तिपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य श्री अजित शिंदे व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात” गौरव मराठी भाषेचा” या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.अनुष्का पाटील हिने केले. संचिता शेजवळ, वेदिका मोहिते, राज शेळके, प्रगती भिसे यांनी याप्रसंगी भाषणे केली. प्रा. निलोफर संदे,प्रा. वर्षाराणी कोळी यांनीही मनोगतातून मराठी भाषेचे महत्त्व कथन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य अजित शिंदे यांनी मातृभाषा ही संस्कृतीचे वहन करते. मातृभाषेचे जतन, संवर्धन काळाची गरज आहे. यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न सर्वांनी करावेत असे आवाहन केले
कार्यक्रमाचे आभार कु.प्रगती भिसे हिने मानले तर सूत्रसंचालन कु.सान्वी तिकुडवे हिने केले



