सातत्यपूर्ण अभ्यास व नियोजन केल्यास उज्वल यश मिळेल-श्री अजित शिंदे.
दौलतनगर दि.30
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने ज्ञानप्राप्ती केली पाहिजे. सर्व मूलभूत घटक मनापासून समजावून घेतले तर बारावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाता येईल.सातारा जिल्हा ही थोर संत- महंत वीर पुरुषांची भूमी आहे या महापुरुषांचा आदर्श घ्या व उज्वल यश संपादन करा ,असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना कॉलेजचे प्राचार्य श्री अजित शिंदे यांनी केले.
मोरणा शिक्षण संस्थेच्या श्रीमती विजयादेवी देसाई जुनिअर कॉलेज दौलतनगर या कॉलेजच्या एच एस सी शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सचिन शिंदे, श्री अजित देसाई सर व सर्व प्राध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निलोफर संदे यांनी केले. प्रास्ताविकात आपण वर्षभर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी कॉलेजमध्ये भरपूर उपक्रम राबवले आहेत. सर्व शिक्षकांनी अगदी मनापासून अध्यापन केले आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन सातत्यपूर्ण अभ्यास करावा असा विद्यार्थ्यांना संदेश प्रास्ताविकात त्यांनी दिला.
या प्रसंगी कॉलेजमधील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कु.सानिका पाटील, कु, सानिका शेजवळ , कु रिद्धी घाडगे, कु . समीक्षा माळी, निहाल नांगरे ,साहिल लोहार ,सनी जाधव या विद्यार्थ्यांनी भाषणे केली
जिल्हास्तरीय तालुकास्तरीय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला व कॉलेजच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती चित्रफितीद्वारे प्रा. वर्षाराणी कोळी यांनी दिली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरा निकम यांनी केले तर आभार प्रा. हुदा इनामदार यांनी मानले



