0

शिक्षक पालक विद्यार्थी सहविचार सभा .             दि-१८/०३/२०२६

Share

श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर-शिक्षक पालक विद्यार्थी सहविचार सभा संपन्न.

    आज दि-१८/०३/२०२६ रोजी श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे शिक्षक पालक विद्यार्थी सहविचार सभा आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आले. बारावीचा आराखडा सांगत प्रास्ताविक प्रा. संदे एन.आर. यांनी केले. कार्यक्रमाचे पालक प्रतिनिधी श्री. शैलेश दिंडे यांनी मोबाईलचा वापर टाळावे असे सांगितले व बारावी साठी शुभेच्छा दिल्या. ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अजित तानाजी शिंदे सर यांनी केले. प्रा. निकम एम. ए. व प्रा. शेजवळ टी.जे. यांनी शिक्षक मनोगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कोळी व्ही. एस. यांनी केले. व आभार प्रा. रजपूत एस.पी.यांनी मानले. या कार्यक्रमासाठी  पालक, शिक्षक, शिक्षिके‌त्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते