गोकुळ -धावडे | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (टप्पा क्रमांक ३) मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयाचे नुकतेच परीक्षण करण्यात आले. या तपासणीसाठी नियुक्त केलेल्या विशेष समितीने शाळेला भेट देऊन विविध उपक्रमांची आणि शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी केली.या परीक्षण समितीमध्ये कोकिसरे केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. डी. टी. शिंदे साहेब, तालुक्याचे क्रीडा समन्वयक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाकडेचे वरिष्ठ शिक्षक मा. श्री. ता. रा. पवार सर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मान्याच्यावाडीचे शिक्षक मा. श्री. जोतिराम शिंदे सर यांचा समावेश होता.समितीने शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, स्वच्छता आणि शाळेने राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यांची बारकाईने पाहणी केली. शाळेचा परिसर आणि विद्यार्थ्यांची शिस्त याबाबत समितीने समाधान व्यक्त केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. एन. एस. कुंभार सर यांनी समितीचे स्वागत केले आणि शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.







