मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे ता. पाटण जि. सातारा येथे “स्वच्छ व हरित विद्यालय” या राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन प्रक्रियेसाठी केंद्रीय स्तरीय समितीचे सदस्य मा. श्री. अजय सोनवणे (M.S.W., M.Phil) यांनी भेट दिली.विद्यालयात आगमन होताच मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर तसेच शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापक मा श्री कुंभार एन. एस. सर व इको क्लब चे प्रमुख मा श्री विकास लोहार सर यांच्याकडून शाळेतील स्वच्छता उपक्रम, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त परिसर, सांडपाणी व्यवस्थापन, शालेय परसबाग, औषधी वनस्पती बाग, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.मा. श्री. अजय सोनवणे यांनी शाळेचा संपूर्ण परिसर पाहणी करून स्वच्छता, हरित वातावरण, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिस्त यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश दिला.विद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी केलेले नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सर्वांच्या सहभागाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालय परिवाराने “स्वच्छ व हरित शाळा – उज्ज्वल भारताची पायाभरणी” असा निर्धार व्यक्त केला.

Posted inNews and Events















