न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व प्रयोगशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न महान शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यालयातील विज्ञान विषय शिक्षकांना पुष्प देऊन राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात संशोधन वृत्ती ठेवून नवनवीन प्रयोग करावेत व देशाच्या प्रगतीत आपला मोलाचा वाटा उचलावा, असे त्यांनी आवाहन केले.यावेळी सौ. पवार मॅडम यांनी विज्ञान विषयावर आपले विचार व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक प्रयोग सादर करून विज्ञानाविषयीची आवड व्यक्त केली. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. यामुळे संपूर्ण परिसरात विज्ञानमय वातावरण निर्माण झाले होते. हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी जि प प्राथ शाळा धावडेचे विद्यार्थी व शिक्षक श्री नेवसे सर, जि प प्राथ.शाळा कोरडेवाडीचे विद्यार्थी व शिक्षक श्री जाधव सर, जि.प प्राथ. शाळा शिद्रुकवाडीचे विद्यार्थी व शिक्षक श्री. यादव सर व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. वैभव घोणे सर यांनी केले तर श्री. विकास लोहार सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *