न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पक्षी संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचा पक्षी संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे येथील इ. 5वी ते10 वी च्या विद्यार्थ्यांनी पक्षी संवर्धनासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना पाणी व अन्नाची कमतरता भासू नये यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या घराशेजारी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी व धान्याची व्यवस्था केली आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मातीची भांडी, वाटी किंवा बाटल्यांमध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवले तसेच ज्वारी, बाजरी, तांदूळ आदी धान्य पक्ष्यांसाठी ठेवले. यामुळे परिसरातील चिमण्या, व इतर पक्ष्यांना दिलासा मिळत आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यास या उपक्रमामुळे मदत होत आहे.मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इको क्लब प्रमुख श्री.विकास लोहार सर व शिक्षकांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडूनही कौतुक करण्यात येत आहे.हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये दयाभाव, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *