मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या पोषणावर भर देत एक खास उपक्रम राबविला. शाळेच्या पारसबागेतून ताज्या आणि पौष्टिक केळी विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून देण्यात आल्या.मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आनंदाने दिलेल्या केळीचा आस्वाद घेतला व यामुळे त्यांच्या दैनंदिन आहारात आवश्यक पोषक तत्वांची भर पडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला गेला.शाळेतील शिक्षक वर्गही या उपक्रमाचे प्रोत्साहन देत आहेत आणि असे उपक्रम नियमित राबविण्याचा मानस असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांच्या आरोग्यास व पोषणास प्राधान्य देणारी ही पावले शाळेच्या शिक्षणात नवीन अध्याय जोडणारी ठरली आहेत.

Posted inNews and Events


