मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. यांची प्रमुख उपस्थिती लाभली.सर्व उपस्थितांचे स्वागत श्री. घोणे सर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कला, कौशल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीत, तसेच विविध कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि मंचावरील सादरीकरण विशेष कौतुकास्पद ठरले.यावेळी मुख्याध्यापक श्री. कुंभार एन. एस. यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शेवटी श्री. विकास लोहार सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Posted inNews and Events





