मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे (ता. पाटण, जि. सातारा) येथे एस.एस.सी.-2026 शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक मा. श्री. शिंदे टी. व्ही. सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सागर नेवसे (मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, धावडे) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी प्रज्ञा अवघडे, दिया पवार व अंजली यादव यांनी मनोगत व्यक्त करून विद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच श्री. विकास लोहार सर, पवार मॅडम व श्री. मोरे सर यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.प्रमुख पाहुणे मा. श्री. सागर नेवसे यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर उज्ज्वल यश संपादन करण्याचा संदेश दिला. अध्यक्षीय समारोपात श्री. शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रेरणा दिली. या कार्यक्रमानिमित्त विद्यालयाचे प्रति कृतज्ञता म्हणून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजीराव देसाई सभागृहासाठी साठी मॅट भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन श्री. घोणे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी पालक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Posted inNews and Events









