न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  मानवी साखळीतून दिला मतदार जनजागृतीचा अनोखा संदेश.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  मानवी साखळीतून दिला मतदार जनजागृतीचा अनोखा संदेश.

गोकुळ-धावडे: लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाचा सहभाग असावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर एकत्र येत मानवी साखळीच्या माध्यमातून ‘मतदान 100% करा ‘ अशी अक्षरे साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व सांगणारे फलकही प्रदर्शित केले होते. “भावी पिढी म्हणून आम्ही जागरूक आहोतच, पण आजच्या मतदारांनीही आपले कर्तव्य बजावून देशाला समर्थ बनवावे,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. विकास लोहार सर यांच्या कल्पनेतून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या या कल्पक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *