न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “दहावी नंतर पुढे काय?” या विषयावर व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत स्वराज्य करिअर अकॅडमी, कोयनानगरचे संस्थापक श्री. सचिन भिसे व संचालक श्री. नितीन पवार यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.यावेळी विविध शैक्षणिक प्रवाह, करिअरच्या संधी, व्यावसायिक अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा तसेच कौशल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांनी योग्य निर्णय कसा घ्यावा याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमास किरण इंटरप्रायझेसचे मालक श्री. प्रवीण पवार तसेच न्यू इंग्लिश स्कूल, नाटोशीचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. सचिन कदम सर हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार श्री विकास लोहा सर यांनी मानले.या कार्यशाळेला विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद तसेच इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी योग्य दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *