मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ- धावडे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या सत्य, अहिंसा व राष्ट्रसेवेच्या कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. वैभव घोणे सर यांनी केले.

Posted inNews and Events



