न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे जिल्हास्तरीय परीक्षण उत्साहात संपन्न.

न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे जिल्हास्तरीय परीक्षण उत्साहात संपन्न.

गोकुळ-धावडे (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (टप्पा-३) मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे उपक्रम तपासण्यासाठी शासनाकडून जिल्हास्तरीय विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या उच्चस्तरीय समितीने शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.या जिल्हास्तरीय परीक्षण समितीमध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता:मा. श्री. अनिस नायकवडी – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सातारामा. डॉ. विजय भिसे – ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट फलटणमा. श्री. गजानन आडे – गटशिक्षणाधिकारीमा. श्री. संतोष कुडेकर – केंद्रप्रमुख, विंगसमिती सदस्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या आणि विविध विभागांची पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला. या जिल्हास्तरीय परीक्षणाच्या वेळी पंचायत समिती पाटण च्या गटशिक्षणाधिकारी सौ दीपा बोरकर मॅडम यांची विशेष उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. एन. एस. कुंभार व श्री. विकास लोहार सर यांनी समितीसमोर शाळेच्या विविध उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले आणि त्याबाबत सविस्तर माहिती दिली.समितीने शाळेतील शिस्त, स्वच्छता आणि शैक्षणिक वातावरण पाहून समाधान व्यक्त केले. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *