गोकुळ-धावडे (प्रतिनिधी): मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संगीत कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री. शिवाजी शेंडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री. बळीराम सुर्वे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. तिरंगा फडकवल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.यावेळी उपस्थितांनी दिलेल्या घोषणानी परिसर दुमदुमून गेला.संगीत कवायतींचे सादरीकरणया सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘संगीत कवायत’. देशभक्तीपर गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध हालचाली आणि विविध प्रकारच्या शारीरिक कसरती पाहून ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. या कवायतींमधून विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि संघभावना दिसून आली.याप्रसंगी धावडे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच श्री. दत्तात्रय अवघडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कुंभार एन. एस. सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी श्री.विकास लोहार सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Posted inNews and Events






