न्यू इंग्लिश स्कूल,गोकुळ-धावडे ता. पाटण या विद्यालयाच्या वतीने आज मौजे-धावडे परिसरातील ओढ्यावर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे काम केले.आपली सामाजिक जबाबदारी म्हणून बांधलेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.या वनराई बंधार्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.मदने जे.एस.,लो.बा.दे.फौंडेशनचे सचिव मा.श्री.कुंभार एन.एस. ,वरिष्ठ शिक्षक मा.श्री.शेजवळ एस.डी. सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी रिकाम्या सिमेंट पोत्यामध्ये रेती दगड व माती भरून सर्वांनी एक दिवस श्रमदान केले.

Posted inNews and Events


