0

राष्ट्रीय सेवा योजना एक दिवसीय श्रमसंस्कार शिबीर

Share

युवकांनी श्रमसंस्काराच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती करावी :- मा.श्री.रविराज देसाई दादा

दौलतनगर : – मोरणा शिक्षण संस्थेच्या श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज, दौलतनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत मौजे सोनवडे येथे एक दिवसीय श्रम संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते, या श्रम संस्कार शिबीराच्या उद्धघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे , तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा हे होते.
यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छता आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. “श्रमाद्वारेच व्यक्तिमत्त्व घडते आणि समाजाप्रती जबाबदारीची कळी रुजते,” यासाठी युवकांनी श्रमसंस्काराच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जनजागृती करावी असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता, कचरा निर्मूलन, तणनियंत्रण, वृक्षसंवर्धन, स्वच्छ परिसर जनजागृती अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. श्रमदानातून “माझे कॉलेज – स्वच्छ व सुंदर कॉलेज ”,”माझे गाव – स्वच्छ गाव” माझे गाव – प्लास्टिकमुक्त गाव हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन एन.एन.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.कु.वर्षाराणी कोळी यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव मा.डी.एम.शेजवळ दादा, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अजित शिंदे,सोनवडे गावच्या सरपंच सौ.वैशाली महाडिक,ग्रामसेवक श्री.सतीश पिसाळ , ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ, महिला वर्ग प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता.यावेळी विद्यार्थ्यांनी श्री.नवलाई मंदीर परिसर ,येथील स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रा. कु.वर्षाराणी कोळी यांनी केले तर उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत प्रा. कु.मयुरा निकम यांनी केले. व शेवटी आभार प्रा.कु.निलोफर संदे यांनी मानले.