दिनांक 14/01/2025 रोजी जागतिक भूगोल दिनानिमित्त भूगोलशास्त्र मंडळाने भित्तिपत्रक प्रदर्शनाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून श्रीमती विजयादेवी देसाई सिनिअर कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते. मा.प्राचार्यांच्या हस्ते भित्तिपत्रकाचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रकाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न केला.
भित्तिपत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देणारे एक व्यासपीठ उपलब्ध होत असते.भित्तिपत्रक हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला कलाटणी देणारे व्यासपीठ आहे.असे मत प्राचार्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते



