मोरणा शिक्षण संस्था संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अॅण्ड कॉमर्स जुनिअर कॉलेज मरळी येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्स्फूर्तपणे साजरा केला गेला. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मा.प्राचार्य श्री कांबळे व्ही.एन (प्राचार्य सिनिअर कॉलेज) यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. राष्ट्रगीत व ध्वजगीत झाल्यानंतर माननीय प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना उदबोधित केले विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती तथा देशाप्रती समर्पणाची भावना रुजली पाहिजे तथा आपल्या हातून देशसेवा घडली गेली पाहिजे हे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी श्री शिंदे ए .टी (प्राचार्य ज्युनिअर कॉलेज) तसेच ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.




