0

Career in Commerce

Share

श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स जुनियर कॉलेज व सीनियर कॉलेज वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित Career in Commerce हा कार्यक्रम आज लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक लघु सभागृह या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी CA कु. विद्या प्रशांत बादल या प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्या त्यांनी विद्यार्थ्यांना कॉमर्स मधील विविध करिअरच्या संधी,व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जाणीव, कौशल्य विकास अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले या कार्यक्रमप्रसंगी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री शिंदे ए. टी. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संदे एन. आर. तसेच सीनियर कॉलेजच्या वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. पाटील टी. ए. सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी सीनियर व जुनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. निकम एम. ए. यांनी केले तर आभार प्रा. पाटील टी. ए.यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.