0

ध्यास गुणवत्तेचा…विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचा…

Share

ध्यास गुणवत्तेचा…विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचा…
🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♀️
मोरणा शिक्षण संस्थेच्या श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयामध्ये शै.वर्ष 2026-2027 या वर्षामध्ये महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थांना गुणात्मक वाढीबरोबर त्यांचा सर्वागीण विकासासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री अजित शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये 10वी नंतर पुढे काय ? याविषयावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये प्रा.कु.मयुरा निकम, प्रा. रोहिणी यादव, प्रा. निलोफर संदे,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शरद शेजवळ सर यांनी प्रास्तविक केले तर आभार श्री. संतोष कदम यांनी मानले.
या कार्यशाळेसाठी जुनिअर कॉलेजच्या प्रा. इनामदार एच.एस. प्रा.कु.रजपूत एस. पी.प्रा.कु.शेजवळ टी.जे. श्री.परीट एच.एम.व श्री.देसाई एन.पी. यांची प्रमुख उपस्थिती होती.