श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज, दौलतनगर विद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस विविध उपक्रम घेऊन साजरा
श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज, दौलतनगर या कॉलेजमध्ये आज 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. थोर गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. हे पूजन प्रमुख पाहुण्या कार्वेकर मॅडम आणि महाविदयालयाचे प्राचार्य श्री शिंदे ए.टी सर यांनी केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन रांगोळी स्पर्धां व भित्तिपत्रीक प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये ओम सुतार, संजना , सानिका शेजवळ, रिद्धी घाडगे, मधुरा पाटील, प्रज्ञा पवार, पियुष दिंडे, प्रकाश गव्हाणे, साक्षी माने, वैष्णवी कांबळे, आदिती सत्रे व तनिष्का भिसे यांनी उत्तम रांगोळ्या काढल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराली गिरी व श्रावणी पाटील या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेजवळ मॅडम यांनी केले. यानंतर विद्यार्थिनी प्रगती भिसे हिने रामानुजन यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सादर केली. त्यांच्या अलौकिक गणितीय बुद्धिमत्तेचे व संशोधनशील वृत्तीची ओळख करून देत प्रा. रजपूत मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य शिंदे सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना कठोर परिश्रम, सातत्य व जिज्ञासा यांच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.संदे मॅडम यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.




