महाराष्ट्र राज्याच्या नकाशात पाटण तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षराने कोरणारे स्व. शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांची जयंती उत्साहात संपन्न.
दौलतनगर दि.:२०/११/२०२५,
श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे आज स्व. शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब ८२ वी जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अजित शिंदे सर यांच्या हस्ते
स्व. शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तसेच आबासाहेब यांच्या कार्याचा उजाळा देण्यासाठी भित्तिपत्रकाचे उदघाटन करण्यात आले. गोरगरिबांना ज्ञान मिळण्यासाठी मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची स्थापना स्व. शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब यांनी केली त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जतन करावा असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अजित शिंदे सर यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ११ वी सायन्स ची विद्यार्थिनी कु.श्रावणी पाटील हिने केले. कु. प्रगती भिसे, कु. सानवी तिकुडवे, कु. अमृता कदम
कु. किरण शेजवळ या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. कु. सानिका पाटील हिने कार्यक्रमाचे आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. अशा रीतीने कार्यक्रम संपन्न झाला.
