मा. ना. श्री. शंभूराजे देसाई साहेब यांचा वाढदिवस कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरा
मा. ना. श्री. शंभूराजे देसाई साहेब पर्यटन, खणीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा वाढदिवस मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई जुनियर कॉलेज दौलतनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शिंदे ए.टी. सर,सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

