0

माजी खासदार स्व. शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुखसाहेब जयंतीनिमित्त एच. एस. सी. विद्यार्थी गुणगौरव समारंभ

Share

स्व.शंकरराव देशमुख साहेबांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. -रविराज देसाई साहेब
दौलतनगर दि.29
नाशिकचे माजी खासदार स्वर्गीय शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख साहेब यांचे कार्य समाजाला पुढे नेणारे आहे .त्यांनी सरपंच पदापासून नगराध्यक्ष, आमदार ,खासदार अशा विविध पदावर कार्य केले. त्याचबरोबर नाशिक रोड येथील बिटको कॉलेजची स्थापना, दुर्गा उद्यानाची निर्मिती त्याचबरोबर गोखले एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त म्हणून देखील कार्य केलेले आहे .राज्यसभा सदस्य म्हणून त्यांना मिळालेले मानधन हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी दान केले .असे हे शिक्षण प्रिय व्यक्तीमत्व होऊन गेले.त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात घ्यावा असे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा रविराज देसाई साहेब यांनी केले. ते स्वर्गीय बाळासाहेब देशमुख यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त श्रीमती विजयादेवी देसाई जुनिअर कॉलेज दौलतनगर येथे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या प्रसंगी युवानेते जयराज देसाई, कॉलेजचे प्राचार्य अजित शिंदे व इ. 12वीतील गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी खालील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.12 वी
शास्त्र शाखेतील प्रथम व अडूळ केंद्रात प्रथम कु. समृद्धी नानासो पवार- 71.33%, अडूळ केंद्रात द्वितीय कु.हर्षदा विलास लोकरे 69.50%, तृतीय क्रमांक कु. तेजस्विनी बनाजी शिर्के -57%. व वाणिज्य शाखेतून पाटण तालुक्यात द्वितीय व कॉलेजमध्ये प्रथम कु.श्रावणी जगन्नाथ यादव, 87.50%, अडुळ केंद्रात द्वितीय- कु .रूपाली तानाजी सुर्वे 81%, अडुळ केंद्रात तृतीय क्रमांक कु.श्रद्धा परशुराम तिकुडवे 72.33%. या गुणवंत विद्यार्थ्यांनिंना प्रशस्तीपत्र, रोख रक्कम,शालेय वह्या देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री अजित शिंदे सर यांनी केले .स्वर्गीय देशमुख साहेब यांचा जीवनपट मांडतानाच त्यांचे कार्य हे आदर्शवत होते असे त्यांनी सांगितले.शेवटी आभार प्रा. वर्षाराणी कोळी मॅडम यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मयुरा निकम मॅडम यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका , शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.