5 सप्टेंबर 2024
🍁श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर
महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरी 🍁
श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलत नगर मध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून काही विद्यार्थ्यांनी अभिरूप शिक्षकाची भूमिका अतिशय छानपणे बजावली तसेच कार्यक्रमाचे खूप सुंदर असे नियोजन केले होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिरूप शिक्षिका श्रावणी यादव या विद्यार्थिनींने क्रममात्र केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिंदे सर व सर्व शिक्षक यांनी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यांनतर
माननीय अध्यक्ष सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना अभिरूप शिक्षिका श्रद्धा तिकूडवे या विद्यार्थिनी केले तसेच अभिरूप शिक्षिका आणि आपला या दिवसातील अनुभव अतिशय चांगल्या प्रकारे मांडला अनुभव सांगत असताना त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले तसेच प्राध्यापिका संदे मॅडम यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील दुवा कसा असावा याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रा. सोनवले मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून आपली स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करावा असे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय श्री शिंदे सर यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या विचारांवर चालण्याची चालना मुलांना दिली तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट थोडक्यात सांगितला
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजना शिंदे या विद्यार्थिनी केले
थोडक्यात आजचा दिवसाचे सर्व नियोजन आभिरुप शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी नियोजितपणे केले होते
मा.प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी अभिरूप शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले



