0

पालक सहविचार सभा                           

Share

आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी महाविद्यालयांमध्ये शिक्षक पालक विद्यार्थी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेचे मुख्य उद्दिष्ट बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होणे हेच होते ➕➕
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. शिंदे सर प्रमुख उपस्थिती अरविंद शेजवळ तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कोळी मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदे मॅडम यांनी केले
शिक्षक मनोगतामध्ये बारावी वाणिज्य या शाखेच्या वर्गशिक्षिका प्रा.निकम मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच विज्ञान शाखेच्या शाखाप्रमुख व बारावी वर्गाच्या वर्गशिक्षिका प्राध्यापिका सोनावले मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विषय शिक्षक म्हणून प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके पालकांनि घेऊन देणे आशा सूचना पालकांना करण्यात आल्या.
प्रमुख उपस्थितीमध्ये अरविंद शेजवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
अध्यक्ष मनोगतामध्ये सरांनी पालक व विद्यार्थ्यांसमवेत चर्चासत्र पार पडले व विद्यार्थी व पालक यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांनी पालकांना दिले .
कार्यक्रमाचे आभार ताटे सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम
या राष्ट्रीय गीताने करण्यात आले