0

मराठी भाषा गौरव दिन                     27/02/2025

Share

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे दालन म्हणजे भाषा : मा.श्री. अजित शिंदे दौलतनगर :-

भाषा ही मानवाला मिळालेली अमूल्य अशी देणगी आहे,  मराठी भाषेला फार प्राचीन अशी परंपरा आहे.  मराठी भाषेला 1500 वर्षापूर्वीचा इतिहास लाभला आहे.मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने भाषा संवर्धन जतन करणे  तीचे आपल्या जीवनातील महत्व वाढविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेच्या श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर या कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्राचार्य श्री.अजित शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीस कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी  विद्यालयातील विश्वजीत गायकवाड, साहिल लोहार ,कु, रिद्धी घाडगे या विद्यार्थांनी तर  प्रा.वर्षाराणी कोळी , प्रा. कु.मयुरा निकम, प्रा.कु.रोहिणी यादव, प्रा.कु.निलोफर संदे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.सानिका शेजवळ या विद्यार्थिनींने केले तर आभार कु. कल्याणी पाटील या विद्यार्थींनीने मानले. तर सूत्रसंचालन कु.संजना शिंदे या विद्यार्थिनींने केले.  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.