0

महिला दिन 8/03/2025

Share

महिलांनी आत्मसन्मान जपून आरोग्याची काळजी घ्यावे.
डॉ.पल्लवी विभूते
दौलतनगर दि.8. आज सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेतलेली आहे. स्वतःला सिद्ध केलेले आहे .महिला ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे काम करून देशाचा नावलौकिक वाढवतात .याची अनेक उदाहरणे आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रोपदीताई मुर्मू,अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अवकाशकन्या कल्पना चावला, क्रिकेटपटू मिताली राज यांच्याकडून आपण आदर्श घेऊन आपले जीवन आदर्शवत घडवले पाहिजे. परंतु आदर्श जीवनाबरोबर महिलांनी स्वतःचा आत्मसन्मान जपून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन डॉक्टर पल्लवी विभूते यांनी केले .त्या श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स जुनियर कॉलेज दौलतनगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व कॉलेजचे प्राचार्य श्री अजित शिंदे सर्व प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. निलोफर संदे यांनी केले. याप्रसंगी कु .रिद्धी घाडगे,श्रुतिका देसाई, प्रतीक्षा कदम या विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त भाषणे केली. महिला दिनाची औचित्य साधून भित्तिपत्रिका स्पर्धा, पाककला स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर पल्लवी विभूते व प्राचार्य, प्राध्यापिका यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाले.
भित्तिपत्रिका स्पर्धेत विविध कर्तुत्वान महिलांची भितीपत्रके कु. मधुरा पाटील, कु. गायत्री कुंभार, कु.प्रतीक्षा कदम या मुलींनी सादर केली. महिलांना शुभेच्छापर सुंदर रांगोळी ओम सुतार यांने काढली.पाककला स्पर्धेमध्ये सानिका पाटील, प्रतीक्षा कदम, समृद्धी शेजवळ, रिद्धी घाडगे, समृद्धी पवार, संजना शिंदे, गायत्री कुंभार, सानिका शेजवळ, मयूरी शेवाळे, अस्मिता कदम या मुलींनी सहभाग घेऊन अत्यंत चविष्ट पदार्थ सादर केले.
या कार्यक्रमानिमित्त महिलांचे कर्तृत्व अधोरेखित करून महिलांचा सन्मान करावा. असा संदेश प्रा. मयूरा निकम व प्रा. वर्षाराणी कोळी यांनी दिला. महिलांच्या प्रति आदराची भावना कायम ठेवून नेहमी विविध रूपात वावरणारे स्त्री ही वात्सल्य मूर्ती आहे. तिचे स्वत्व जगावे. तिचे अधिकार तिला द्यावी.असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अजित शिंदे यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.संजना शिंदे हिने केले. तर सर्वांचे आभार कु.सानिका पाटील हिने मानले.