विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा : श्री अजित शिंदे
दौलतनगर दि.28 फेब्रुवारी विज्ञानाच्या माध्यमातून जग क्रांती करत आहे. अनेक नवनवीन शोध शास्त्रज्ञ लावत आहेत.भारतानेही नुकतेच चंद्रयान चंद्रावर पाठवले आहे. विज्ञान आणि अवघे मानवी जीवन व्यापून गेले आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी अनेक थोरशास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. डॉक्टर सी व्ही रामन यांनी देखील असेच मानवतावादी संशोधन करून रामन इफेक्ट चा शोध लावला. अशा या थोर शास्त्रज्ञाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेऊन स्वतःमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे .असे प्रतिपादन प्राचार्य श्री अजित शिंदे यांनी केले. ते श्रीमती विजय देवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमानिमित्त वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा, भित्तिपत्रिका प्रदर्शन, वैज्ञानिक मॉडेल असे अनेक उपक्रम आयोजित केले होते. रांगोळी स्पर्धेमध्ये कुमारी रिद्धी घाडगे, ओम सुतार ,अंतरा पवार ,मधुरा पाटील सानिका शेजवळ ,सानिका कुंभार, प्राजक्ता पाटील, श्रुतिका देसाई यांनी उत्कृष्ट रांगोळ्या सादर केल्या त्याचबरोबर आर्यन चव्हाण, वेदांत पाचुपते, प्रतीक पवार यांनी वैज्ञानिक भित्तिपत्रिकेमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावली .महाराष्ट्र जिल्हा वैज्ञानिक मॉडेल केदार बेलवणकर व साहिल लोहार यांनी सादर केले .
या कार्यक्रमात प्रा.ममता सोनावले, प्रा.रोहिणी यादव,प्रा.श्री विवेक कुंभार ,प्रा. वर्षाराणी कोळी यांनी विज्ञान दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. मनोगतात रामन इफेक्ट विषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी नवनवीन संशोधन करून मानवी हितासाठी शोध लावले पाहिजेत अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली . प्रास्ताविक कु.मयुरी शेजवळ हिने केले तर सानिका पाटील ,सेजल शेजवळ यांनी भाषणे केली .आभार सानिका शेजवळ हिने मानले व सूत्रसंचालन संजना शिंदे हिने केले.



