0

एच. एस . सी . शुभचिंतन समारंभ २०२५

Share

 बारावीचे वर्ष हे आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. यावर्षी प्रामाणिकपणे अभ्यास करणे हे आपले कर्तव्य आहे. सर्व विद्यार्थ्यांना आई-वडील शिक्षक हे सातत्याने अभ्यासासाठी प्रोत्साहित करत असतात त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची जाणीव ठेवावी, सातत्यपूर्ण अभ्यास करावा. असे केल्यास बारावीच्या परीक्षेत नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रविराज देसाई यांनी केले.ते श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथील बारावीच्या शुभचिंतन समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.