0

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती

Share

मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर आजदिनांक 3 जानेवारी 2025 रोजी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या  अनंत  अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या,पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीमार्फत मार्फत करण्यात आले होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी यादव या विद्यार्थिनीने क्रमबद्ध केले l तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करताना श्रद्धा तिकुडवे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचा हेतू व कार्यक्रमाचा उद्देश साध्य विद्यार्थी मनोगतामध्ये समृद्धी भांबुरे श्रद्धा तिकुडवे रिद्धी घाडगे  या विद्यार्थिनीने  आपले मनोगत व्यक्त केले

तसेच कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राध्यापिका कोळी मॅडम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तसेच संदे मॅडम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री शिंदे ए.टी सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिपाठ तसेच त्यांचे शैक्षणिक योगदान तसेच सावित्रीबाई फुले यांचे विचार घेऊन चालण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थिनी रिद्धी मोहिते या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त केले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून करण्यात आली.