0

क्षेत्रभेट

Share

क्षेत्रभेट अहवाल(बहुलेश्वर मंदीर)                                                बहुलेश्वर मंदीर

                                          निसरे फाट्यावरून सहा कि. मी. वर बहुले गाव आहे. हे गाव निसरे या गावातून ३ मैल अंतरावर आहे. हे गाव ऐतिहासिक शिवमंदीरासाठी प्रसिध्ध्द आहे. या मंदीराला बहुलेश्वर मंदीर म्हणतात. बहुलेश्वरांनी एका गुराख्याला दर्शन देऊन येथे लिगाची स्थापना करण्याची प्रेरणा दिली अशी आख्यायिकया आहे. दरवर्षी श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदीरात भाविक मोठया संख्येने येतात.बहुले गावाच्या मागच्या बाजूला, एका ओढ्याच्या काठावर बहुलेश्वराचे हेमाडपंती मंदिर बांधलेले आहे.

                                          हे मंदिर जमिनीपेक्षा खाली, खड्यामध्ये बांधलेले आहे. याच्या उभारणीवरून हे मंदिर 13 व्या शतकातील असावं असं वाटतं, मंदिरआवारात जाण्यासाठी, मंदिराच्या मागे दोन बाजूंनी पायऱ्या आणि मंदिरासमोर एक दरवाजा आहे. दरवाज्यातून आत आल्यावर समोरच एक दीपमाळ आणि त्याच्यामागे एक पुष्करणी बांधलेली दिसते. त्यावर एक नंदी स्थापन केलेला आहे. याच्या डाव्या बाजूला एक तुळशी वृंदावन आणि उजव्या बाजूला दशकोनी वृंदावन आहे. याचं बांधकाम मात्र थोडं अलीकडच्या काळात केलं असल्याचं जाणवतं.मंदिराच्या डाव्या-उजव्या बाजूला, तटबंदीसदृश भिंतीमध्ये, कोनाड्यात, लहान-लहान शिवलिंगांची स्थापना केलेली आहे. शिवाय डाव्या बाजूच्या पायऱ्यांजवळ, लहान आकाराची, दोन कुंडं आहेत. त्यामध्ये नेहमी पाणी असतं.मंदिराच्या कळसाचा मात्र जीर्णोद्धार केलेला आहे.