0

राष्ट्रीय सेवा योजना 21/12/2024

Share

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे नेतृत्व गुणाची प्रयोगशाळा – सौ.सुमन कोळी
पाटण- मोरणा शिक्षण संस्थेच्या श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयामार्फत आज राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत एक दिवसीय श्रमसंस्कार शिबिर मौजे सांगवड या ठिकाणी संपन्न झाले. यावेळी सांगवड गांवच्या सरपंच सौ.सुमन कोळी हे ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या ,त्यावेळी त्या म्हणाल्या की,राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे नेतृत्व गुणाची प्रयोगशाळा आहे,आपण आपले घर, शाळा, गाव ,परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे , यासाठी आपणाकडे नेतृत्व गुण असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.अजित शिंदे सर होते,यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याची जाणीव व्हावी,श्रमसंस्कार व्हावेत या उद्देशाने हे एक दिवशीय श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते, असे ते यावेळी म्हणाले,
या दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी सांगवड येथील सिद्धेश्वर मंदिर परिसर व ग्रामपंचायत परिसर येथील स्वच्छता करण्यात आली
या श्रम संस्कार शिबीर कार्यक्रमासाठी सांगवड गावचे उपसरपंच श्री जगन्नाथ पाटील,सदस्य श्री अमोल पाटील ,सर्व ग्रामस्थ, प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग , व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एम.ए. निकम यांनी केले,स्वागत प्रा.कु.एन.आर.संदे यांनी केले तर आभार प्रा.कु.व्ही.एस. कोळी यांनी मानले.