श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स & कॉमर्स ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे, आज दिनांक18/10/2024 रोजी मतदान जनजागृती (SVEEP) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मतदान जनजागृती कार्यक्रमाबद्ल राजश्री बने (बालविकास अधीकारी पाटण) यांचे विशेष व्याख्यान आयोजीत केले होते.त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मतदानाची गरज का आहे, मतदान जनजागृती म्हणजे काय, याबद्दल मार्गदर्शन केले. व SVEEP याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. कांबळे सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी—विद्यार्थिनी उपस्थित होते.
