आज दिनांक 26 /9 /2024 रोजी सकाळी ठीक 1:00 वा.श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे महिला संरक्षण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला बाल विकास केंद्र पाटण व अंतर्गत तक्रार समिती, सखी सावित्री समिती ,एन.एन.एस विभाग ज्युनिअर कॉलेज दौलतनगर यांच्या संयुक्तमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मा.स्वप्निल मस्के संरक्षण अधिकारी पाटण)व मा.संजय पडवळ (सहाय्यक संरक्षण अधिकारी पाटण ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मा.स्वप्निल मस्के सरांनी कौटुंबिक हिसाचार,बालसंगोपन,पोक्सो कायदा,अनाथ आरक्षण तसेच महिलांसाठी असणारे संरक्षण कायदे याविषयी विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनिअर कॉलेजचे प्रा. मा. श्री शिंदे सर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थीनी तसेच सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.



