मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित श्रीमती विजयादेवी देसाई ज्युनिअर कॉलेज दौलतनगर येथे आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी माजी खासदार स्व. शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांची जयंती व जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रविराज देसाई (दादा) उपस्थित होते
तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई फाउंडेशन सचिव मा.श्री कुंभार सर तसेच श्रीमती विजयादेवी देसाई सीनियर कॉलेजचे प्राचार्य मा. श्री कांबळे सर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका निकम एम. ए यांनी केले . प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर यांनी केले . तसेच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आदरणीय रविराज देसाई साहेबांनी स्व. शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द सांगितली तसेच विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या विचारांचा वारसा घेऊन आपले आयुष्य घडवा असे संबोधले……
एच एस सी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका यादव आर . सी.यांनी मांडले कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते..
0





