गतवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये विशेष प्राविण्य माळविलेल्या विद्यार्थ्याचां सत्कार राज्याचे उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री नामदार शंभुराज देसाई व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे पिताश्री , नाशिकचे माजी खासदार स्व. शंकरराव उर्फ् बाळासाहेब देशमुख यांच्या १०८व्या जंयती निमित्त मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ सचंलित न्यु इग्लिश स्कुल नाटोशी या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० मध्ये विशेष प्राविण्य मिळविल्या तिन गुणवंत विद्यार्थ्याचा संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे शुभहस्ते रोख रक्कम ,प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देवुन सत्कार करण्यात आला यावेळी दौलत फौडेंशनचे सचिव नथुराम कुभांर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथमत: अध्यक्ष रविराज देसाई यांचे हस्ते माजी खासदार स्व शंकरराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. व सर्व मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याद्यापक रामचंद्र कदम यांचे हस्ते शाल व श्रीफळ देवुन करण्यात आला. तसेच विध्यालयामध्ये अनुक्रमे शामल रामचंद्र पवार,विशाल दत्तात्रय भिसे,व सायली विलास पवार या तिन विद्य्यार्थ्याना अध्यक्ष रविराज देसाई याच्यां शुभहस्ते प्रशिस्त पत्र व रोख रक्कम देवुन गौरविण्यात आले गत दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता मात्र या वर्षि हा जंयती सोहळा मोरणा शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये साजरा करण्यात आला असल्याने पुढील वर्षि परिक्षा देणार्या परिक्षार्थिसाठी निjश्चितच प्रेरणादायी ठरेल. कार्यक्रमाचे स्वागत उपशिक्षक सचिन कदम व आभार सुभाष देवकर यानी मानले.