मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे सोमवार दिनांक 22/12/2025 रोजी थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. हे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यानंतर विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सादर केली. त्यांच्या अलौकिक गणिती बुद्धिमत्तेची व संशोधनशील वृत्तीची ओळख करून देत विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दल आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना कठोर परिश्रम, सातत्य व जिज्ञासा यांच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री वैभव घोणे सर व आभार श्री शिंदे टी.व्ही. सर यांनी मानले.

Posted inNews and Events

