मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळधावडे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन “विद्यार्थी दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाचे प्रतीक आहेत. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानतेचा दीप प्रज्वलित केला. त्यांच्या कार्यातून प्रत्येक विद्यार्थ्याने प्रेरणा घ्यावी.”
या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थी सभा समितीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

Posted inNews and Events

