गोकुळ-धावडे :- सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सुलेखन- शुद्धलेखन स्पर्धेत मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.अंजली आनंदा यादव इयत्ता – 10 वी या विद्यार्थीनीने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे.याबद्दल या यशस्वी विद्यार्थीनीचे व मार्गदर्शन करणारे हिंदी विषयाचे शिक्षक श्री. विकास लोहार सर यांचे महाराष्ट्र राज्यांचे पर्यटन खनीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री मा. नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा), लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा),युवा नेते मा.जयराज देसाई (दादा), युवा नेते मा.आदित्यराज देसाई (दादा), संस्थेचे उपाध्यक्ष,सचिव, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर,सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,सर्व आजी-माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

Posted inNews and Events

