गोकुळ -धावडे-मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा श्री. कुंभार एन. एस.सर होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी शांतता पाळून महामानवास आदरांजली वाहिली.विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.कुंभार एन. एस.सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेबांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र दिला. ते म्हणाले की, “केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता, विद्यार्थ्यांनी समाजातील अनिष्ट रुढींविरुद्ध लढण्याचे आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे.”कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन. यामुळे संपूर्ण वातावरणात देशभक्ती आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वैभव घोणे सर व आभार श्री.विकास लोहार सर यांनी मानले. कार्यक्रमसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events


