कै. सौ. वत्सलादेवी देसाई हायस्कूल मरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनात मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक व मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. अक्षरा शांताराम विचारे व कु. पूजा शिवाजी बोत्रे यांनी सादर केलेल्या उपकरणास तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळाला.या प्रदर्शनात शाश्वत शेती विषयावर सादर केलेल्या प्रयोगात नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर, पर्यावरणपूरक शेती पद्धती, पाण्याचा योग्य वापर आणि रासायनिक खतांचा मर्यादित वापर याविषयी प्रभावी मांडणी करण्यात आली होती. परीक्षकांनी या प्रयोगाचे विशेष कौतुक केले.या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण विभाग तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार मा.श्री. शंभूराज देसाई साहेब ,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी चे अध्यक्ष मा. श्री. रविराज देसाई दादा , लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. यशराज देसाई दादा , युवानेते मा. ॲड.जयराज देसाई दादा व युवानेते मा. चि.आदित्यराज देसाई दादा, तहसीलदार मा.श्री. अनंत गुरव साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. सौ. बोरकर मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ,सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांनी कु. अक्षरा विचारे, कु. पूजा बोत्रे व मार्गदर्शक उपक्रमशील विज्ञान शिक्षक व मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस. सर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Posted inNews and Events





