मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे “स्वच्छ व हरित विद्यालय” या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने भेट दिनांक 10/11/2025 रोजी दिली.या समितीत मा श्री. राजेंद्र पवार सर मा.श्री.दत्तात्रय नाळे सर या पर्यावरण तज्ज्ञांचा समावेश होता. समिती सदस्यांनी विद्यालयातील स्वच्छता, पिण्याचे पाणी, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त परिसर, तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी राबवलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे निरीक्षण केले.विद्यार्थ्यांनी तयार केलेली कापडी पिशव्या, आकाशकंदील, जुनी वही पुनर्वापर उपक्रम, पक्ष्यांसाठी घरटी आणि शाळेच्या परिसरातील फुलझाडे, औषधी वनस्पतींची बाग, केळीची परसबाग समितीच्या विशेष लक्षात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कुंभार एन. एस.सर व श्री. विकास लोहार सर यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती समितीसमोर मांडली.समिती सदस्यांनी विद्यालयाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे पर्यावरणाबद्दलचे कार्य प्रशंसनीय असल्याचे नमूद केले. शेवटी समितीने विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत शुभेच्छा दिल्या. या भेटी दरम्यान मोरगिरी केंद्राचे केंद्र संचालक मा.श्री.बी.के.पवार सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events





