मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सामूहिकरित्या गायले.तसेच श्री. विकास लोहार सर व विध्यार्थिनी यांनी देशभक्ती गीते सादर केली. गायनावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावना आणि उत्साहाने दुमदुमून गेला.या कार्यक्रमात श्री. घोणे सर यांनी ‘वंदे मातरम’ गीताचे ऐतिहासिक महत्त्व, त्याचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे योगदान, तसेच या गीताने स्वातंत्र्य संग्रामात दिलेली प्रेरणा याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक मा. श्री कुंभार एन. एस. सर यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीची भावना जोपासत राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार श्री. शिंदे सर यांनी मानले.

Posted inNews and Events



