मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ-धावडे येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवातीला श्री.टी. व्ही. शिंदे सर यांनी पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. बालदिनानिमित्त शिक्षकांनी मुलांना नेहरूंच्या बालप्रेमाची माहिती देत त्यांचे आदर्श जीवन विद्यार्थ्यांसमोर उभे केले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Posted inNews and Events




